उज्जायी प्राणायाम

१) दोन्ही हात मांडीवर पालथे ठेवा

२) दोन्ही नाकपुडीने संथ,हळुवार कंठाचे आकुंचन करून श्वास घ्या .(पूरक स्थिती )

३) अशा प्रकारच्या आकुंचनामुळे श्वसनमार्ग आकुंचित होतो व आत जाणाऱ्या हवेला अडथळा निर्माण होतो.या अडथळ्यामुळे हवेचा घर्षणयुक्त ध्वनी निर्माण होतो.

४) कुंभक- थोडा वेळ

५) रेचक- पुराकाप्रमाणेच कंठसंकोच करून रेचकाला प्रारंभ करावा.रेचक हा पुराकापेक्षा दुप्पट वेळेचा असावा.

६) वरीलप्रमाणे सात आवर्तने करा.