भाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी प्राणायाम
भाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी प्राणायाम
१) एक साधारण श्वास घ्यावा.
२) आता श्वास पूर्ण बाहेर सोडा व रोखून ठेवा व थांबा.
३) श्वास घ्यावा असे वाटत असतानाच पुन्हा श्वास बाहेर सोडा.
४) आणखी श्वास घ्यावा असे वाटतं असताना पुन्हा श्वास बाहेर सोडा.
५) पूर्ण श्वास बाहेर गेलेला आहे असे वाटल्यानंतर हि क्रिया थांबवा.
६) आता संपूर्ण श्वास आत घ्या व थांबा.
७) आता श्वास सोडावा असे वाटत असताना आणखी जास्त श्वास घ्या.
८) परत श्वास सोडावा असे वाटत असताना आणखी जास्त श्वास घ्या.
९) परत श्वास सोडावा असे वाटत असतानाच पुन्हा श्वास घ्या.
१०) पूर्ण श्वास आत घेतला गेलेला आहे असे वाटल्यानंतर हि क्रिया थांबवा.
११) हे एक आवर्तन झाले. अशी आठ आवर्तने करणे.