कपालभाती - शुद्धिक्रिया
कपालभाती - शुद्धिक्रिया
हि श्वसन संस्थेची शुध्दक्रिया आहे.
कपाळ म्हणजे कवटी
भाती म्हणजे शुद्धता .
कवटीतील इंद्रिये व श्वसन संस्थेची शुद्धता हि म्हणजेच कपालभाती होय .
-हि क्रिया कुठल्याही ध्यानात्मक आसनात करावी .
-हात द्रोण मुद्रा मध्ये गुडघ्यावर ठेवणे
-पाठीचा कणा ताट ,मान सरळ ,डोळे अलगद मिटलेले ,संथ श्वसन .
-प्रथम सावकाश श्वास घेणे .
-घेतलेला श्वास पोटाच्या स्नायूंच्या साहाय्याने श्वासपटलाच्या साहाय्याने जोरदार झटका देत श्वास सोडणे (पोट आत खेचून )(प्रयत्ननपूर्वक रेचक )
-श्वास सोडल्यानंतर श्वास स्वतःहून घ्यायचा नाही .
-पोटाचे स्नायू ढिले सोडायचे ,श्वास पटल वर जाईल .
-श्वास आपोआप घेतला जाईल (प्रयत्नशून्य पूरक )
-आता पुन्हा पोटाच्या स्नायूंच्या व श्वास पटलाच्या साहाय्याने पोट आत खेचून श्वास बाहेर सोडणे
-श्वास सोडल्यानंतर फक्त हीच क्रिया जलद करावी २ आवर्तने /sec
-एका सेकंदात २ आवर्तने अशी १ ते १० मिनिटापर्यंत करू शकतात .
-हि क्रिया करत असताना दम लागायला नको .
फायदे :
-श्वसन संस्था शुद्ध होऊन प्राणायामासाठी तयार होते.
-कवटीत सर्व इंद्रिये मेंदू,कान ,नाक ,घास शुद्ध होतात.
-पोटातली इंद्रिये शुद्ध होऊन पचन सुधारते.
-हृदयाला ,मेंदूला छान मसाज मिळून त्यांचे कार्य सुधारते .
-आवाज सुधारतो .
-चेहऱ्याला रक्तपुरवठा होऊन त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते .
-पोटावरील मेद कमी होतो .
-प्राणवायूचा पुरवठा अधिक होतो.
काळजी:
सहा महिन्यापूर्वी पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर करू नये .
हृदयाची शस्रक्रिया किंवा हृदयाचे किंवा मेंदूचे विकार असेल तर करू नये .