श्वास हा आपल्या शरिरातील उर्जेचा महत्वाचा स्त्रोत आहे.योग्य पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दुर पिटाळतो.योगाभ्यासात केलेला प्राणायामाचा सराव तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवतो व तुमचे शरीर आणि मन संतुलित करतो.निरोगी आयुष्यासाठी तुम्ही हे प्राणायाम दिवसभरात कोणत्याही वेळी रिकाम्या पोटी करु शकता.

‘प्राण’ म्हणजे वैश्विक जीवन शक्ती होय,तर ‘आयाम’ म्हणजे तिला नियंत्रित करणे, दीर्घ करणे. आपल्या शारीरिक आणि सूक्ष्म स्तरांसाठी प्राणशक्तीचे खूप महत्त्व आहे, जिच्या शिवाय आपले शरीर नष्ट पावू शकते, जिच्यामुळे आपण जिवंत आहोत. श्वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे प्राणायाम. या प्रक्रिया नासिकांद्वारे श्वास घेण्यावर अवलंबून आहेत.

Today's Health Tip