नियम

शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत

शौच:

शौचम्हणजे शुद्धता, हिंसेप्रमाणेच हि शुद्धताही कायिक, वाचिक व मानसिक अशा तीन प्रकारची आहे. कायिक शुध्दतेमध्ये एक बाह्यशुद्धी व दुसरी अंतःशुद्धी आहेत. बाह्यशुद्धी मध्ये दात नीट घासण्यापासून अनेक प्रक्रिया आहेत. अंतःशुद्धीकरिता धौती, बस्ती, नेती, वितर्क, नौली, कपालभाती हे सहा प्रकार आहेत. शौचस्थिरतेपासून सत्यशुद्धी, मनाची प्रसन्नता, चित्ताची स्थिरता , इंद्रियांचा जय व आतमदर्शनाची योग्यता ह्या गोष्टी प्राप्त होतात.

 

संतोष:

समाधान हि मनाची स्थिती आहे. जे आहे, जे मिळाले आहे त्यातच संतोष मानायकल शिकल्याने जीवनातील बरेच दुःख कमी होते.याकरिता  मानसिक तयारीची आवश्यकता असते .संतोष हि वृत्ती मानाने एकदा आत्मसात  केली म्हणजे शास्वत सुख दूर नाही .सुखाचे मूळ या संतोषी वृत्तीतच आहे.जो नेहमी संतोषी वृत्तीने राहण्याचा आभास करतो त्याच्या सर्व प्रकारच्या तृष्णा क्षीण होऊन सत्वाचा उत्कर्ष झाल्यामुळे त्याला पराकाष्टेचे सुख प्राप्त होते.

 

तप:

तप मजणंहे चांगल्या उद्देशाने एखादी त्रासदायक गोष्ट सहन करणे.त्यापासून शारीरिक व मानसिक पीडा झाली तरी पण ते कार्य न सोडता अखंडपणे करीत राहणे म्हणजे तप होय ..जे तप मोठ्या श्रद्धेने व फळाची अभिलाषा न धरता केले जाते ,ते सात्विक तप होय. सत्कार पूजा ,मान इ.प्राप्त व्हावे म्हणून केले जाते ते राजास तप होय.जे मूर्खपणातून,विधीवाचून केलेले व शरीराला पीडा देऊन केलेले किंवा दुसऱ्याला त्रास देण्याकरिता केले जाते ते तामस तप होय.अशुद्धी म्हणजे अधर्म .हा तामस गन आज .हा अणिमादि सिद्धीनं झाकुनटाकणारा माळ आहे.

 

स्वाध्याय :

स्वाध्यायात श्रवण  व मनं यांचा अंतर्भाव होतो .सामान्य व्यवहारी जीवन जगताना आपल्याला जे शिकविले आहे हे पुनःपुन्हा करणे म्हणजे स्वाध्याय .

 

ईश्वरप्रणिधान :

 ईश्वराचे अस्तित्व मान्य करून ,त्याचे माहात्म्य जाणून त्याची निरपेक्ष भावनेने भक्ती करणे म्हणजे ईश्वरप्रणिधान होय.विश्वाच्या मुळाशी एक दिव्या भक्ती निश्चित आहे.त्या दिव्या शक्तीची ओळख करून घेऊन त्या शक्तीशी पूर्ण शरणागती म्हणजे ईश्वरप्रणिधान होय.ईश्वरप्रणिधानाने समाधी सध्या होते.

Today's Health Tip