धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग योगाची तीन अंगे आहेत. या तिघांना पतंजली महाराजांनी 'संयम' म्हटले आहे. म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधी या एकाग्रतेच्या एकानंतरच्या एक अशा प्रगत अवस्था आहे.

|| देशबन्धाचित्तस्य धारणा ||

अतिचंचल मनाला विशिष्ट बंधनात अडकवून ठेवणे म्हणजे धारणा.

एखाद्या गोष्टीचे मनाला बंध घालून घ्यायचे व त्यावरच मन विशिष्ट मर्यादेत स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. उदा. ओंकार, गुरुजी, कुठलेही दैवत किंवा तुमच्या आवडीचे आलंबन / वस्तु / फोटो.

धारणा म्हणजे मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास, धारणा करत असतांना बाहेरचे अडथळे नको असतात. उदा. अन्य आवाज / वेगवेगळे गंध, तीव्र प्रकाश, गडबड इ. धारणा करताना शांत अशा ठिकाणी आसनावर पद्मासन / सुखासन / स्वस्तिकासनात बसावे. आलंब उदा.ओंकार घेऊन त्यावर मन आणि दृष्टी एकाग्र करावी. मुखातुन ओंकाराचा जपही संथ व सावकाशपणे करा. वाणीने ओंकार जप चालु आहे. मन दृष्टीने मन ओंकार व बधास्त आहे. आणि कानावर पडत असलेला जपही मनाला ओमकाराचीच जाणीव करेल. म्हणजेच ओमकार हे आलंबन आहे व ओमकाराची व्याप्ती ही चित्ताला घातलेले देशबंध आहे.

हळूहळू आधी डोळे बंद करायचे मग मुखातून जप बंद करायचा. ऐकणे चालु ठेवा, हळूहळू ऐकणेही बंद करा. हया तीन इंद्रीयांच्या सहाय्याने अनुभवलेला ओकांराच्या स्मृतीवरच मन केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. या अनुभुतांचा देशबंध चित्ताला घालणे म्हणजेच धारणा.

हे करीत असताना मन अन्य गोष्टी / विचारांकडे वळते. अशावेळी धारण खंडीत होते मग मनाला पुन्हा अनुभुतीवर आणावे लागते. असे अनेक अडथळे धारणा करताना येतात. अशा अडथळयाशिवाय जी एकाग्रतेची प्रक्रिया घडते ती धारणा आहे.

Today's Health Tip